खासदार नवनीत राणा यांना थेट अफगाणिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी, रवी राणा म्हणाले…
खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तान मधून आलेल्या धमकी प्रकरणी आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'याप्रकरणी ओवीसी यांची चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी यावर बोलतांना केली.
अमरावती, ६ मार्च २०२४ : खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून राणांना धमकी देण्यात आली. खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तान मधून आलेल्या धमकी प्रकरणी आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘याप्रकरणी ओवीसी यांची चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. ओवैसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरचं बाहेर येईल’, असे रवी राणांनी म्हटले तर लोकसभेमध्ये खासदार ओवैसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. अनेकदा ओवैसीच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्या. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून धमकी आली आणि मोठ-मोठया भाजपच्या नेत्यांची नावे घेतलीत. यासंदर्भात माझं रश्मी शुक्ला यांच्याशी बोलणं झालं आहे. अनेकदा देशाला उडवून देण्याची धमकी दिली. गृह विभाग याची चौकशी करत आहे. तर केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही रवी राणांनी यावेळी केली.