'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका, काय केला हल्लाबोल?

‘बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते’, रवी राणांची जहरी टीका, काय केला हल्लाबोल?

| Updated on: Oct 18, 2024 | 2:17 PM

भाजपने नवनीत राणांचा पराभव केला असं वक्तव्य बच्चू कडूंनी केल्याचे पाहायला मिळाले होते. बच्चू कडूंच्या या वक्तव्यानंतर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बघा काय म्हणाले आमदार रवी राणा?

‘बच्चू कडू हे महायुतीत होते. ते गुवाहाटी गेले तिथे खोक्यांचं डील झालं तेव्हा अचलपूरच्या जनतेला विचारलं नाही. आज मंत्रिपदाचा दर्जा त्यांना आहे. महायुतीत राहून मंत्रिपद घेण्यासह, खोक्यांचं राजकारण, भष्ट्राचार करणे तेव्हा बच्चू कडूंना महायुती चालते. पण जेव्हा नवनीत राणा लोकसभेसाठी उभ्या होत्या तेव्हा बच्चू कडू यांनी उमेदवार दिला आणि नवनीत राणा यांना पाडायची सुपारी घेतली मताचे विभाजन केले’, असे म्हणत रवी राणांनी हल्लाबोल केला. तर कोणी कोणाला पाडलं हे जनतेला सांगण्याची गरज नाही. नवनीत राणा यांना विरोध करणारे बच्चू कडू होते. डमी उमेदवार देऊन नवनीत राणा यांच्या मतांचे विभाजन बच्चू कडू यांनी केले जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आता धडा शिकवेल, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. नवनीत राणांच्या पराभवात रवी राणांचाही वाटा आहे. रवी राणांना नवनीत राणा खासदार हव्या होत्या, असं बच्चू कडूंनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना रवी राणा म्हणाले, ‘बच्चू कडू गांजा पिऊन बोलत होते वाटते. त्यांना चेक करावं लागेल गंजेडी तर झाले नाही. बच्चू कडू यांनी पाहावं 28 हजारांची लीड रवी राणांच्या मतदारसंघातून नवनीत राणा यांना दिली. तर बच्चू कडू यांनी डमी उमेदवार दिल्याने मतांचे विभाजन झाले आणि नवणीत राणा यांचा पराभव झाला असल्याची घणाघातही रवी राणांनी बच्चू कडूंवर केला.

Published on: Oct 18, 2024 02:17 PM