“33 महिन्यात काय केलं झोपा काढल्या का?”; ‘या’ नेत्यानं अमोल मिटकरी यांचा घेतला खरपूस समाचार
VIDEO | कीर्तन केल्यासारखे आरोप प्रत्यारोप करू नका, 'या' नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर टीका केल्याने राणा आणि मिटकरी वाद पुन्हा उफाळून आला आहे. अमोल मिटकरी यांनी रवी राणा यांच्यावर टीका केल्यानंतर आता मिटकरी आणि राणा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. रवी राणा यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर पटलवार करताना अमोल मिटकरी हे कीर्तनकार आहेत. कीर्तन केल्यासारखे त्यांनी आरोप प्रत्यारोप करू नये, असे म्हणत त्यांनी मिटकरी यांना टोला लगावला आहे. रवी राणा यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी केलेल्या कारवाईचीही त्यांनी त्यांना आठवण करून दिली आहे. बघा काय केली रवी राणा यांनी टीका
Latest Videos