उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त हे तीनच लोकं राहतील, रवी राणा यांनी नेमकी कुणाची घेतली नावं; बघा…
VIDEO | ज्या लोकांनी शिवरायांचा अपमान केला त्यांचं साम्राज्य नष्ट झालं, कुणाला लगावला आमदार रवी राणा यांनी खोचक टोला
अमरावती : महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. तेव्हा अमरावतीमध्ये त्या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध केला होता. अमरावतीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता, त्यांची पूजा-आराधनी झाली होती, मात्र उद्धव ठाकरे सरकारने अत्यंत क्रूरपणे हा पुतळा काढण्यात आल्याचे आमरावतीचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. तर हे सांगत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला होता, त्याच ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे..ज्यांनी विरोध केला त्यांना हार टाकायला लावू, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे. यासह उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता गेल्याचेही त्यांनी म्हटले. अमरावती महापालिकेचा शिवरायांच्या पुतळा बसवण्याबाबत ठराव मंजूर झाला आहे. याला कोणी विरोध करू शकत नाही आणि ज्या लोकांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांचं साम्राज्य नष्ट झाल्याचेही रवी राणा यांनी म्हटले आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
