Navneet Rana म्हणाल्या, ‘यशोमती ताई आमच्या ननंदबाई..,’; अन् काय दिला खोचक सल्ला?
VIDEO | अमरावती जिल्ह्यातील नणंद-भावजाई यांच्यातील वाद शिगेला, अपशब्द शब्द बोलणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांनी दिलं जशाच तसं प्रत्युत्तर? आणि काय दिला खोचक सल्ला
अमरावती, १३ सप्टेंबर २०२३ | अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा यांच्यातील वाद चांगलाच शिगेला पोहोचला आहे. रवी राणा यांच्यावर यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपांवर नवनीत राणा यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. नवनीत राणा म्हणाल्या, ‘यशोमती ताई आमच्या ननंद बाई आहेत. त्या जे बोलताय. त्या जिल्ह्याच्या मुलगी तर मी बरेच वर्ष येथे सून म्हणून काम करत आहे. पण माझं त्यांना सांगणं आहे की, चेक दिले असते तर तुम्ही पुरावे ठेवून दिले असते पण रवी राणा यांनी कडक नोटा दिल्या आहेत. लहान मुलांनाही माहित आहे की, त्याचे पुरावे नसतात. त्यांनी ही गोष्ट झोंबण्याचं काही कारण नाही. पण त्या माझ्या नंनदबाई असल्याने मला वहिणी या नात्याने त्यांची काळजी करावी लागले. त्यांनी एकदा चेकअप करून घ्यावं त्यांचा बीपी वाढलेला दिसतोय. कारण त्यांची भाषा अशोभनीय आहे.’, असे म्हणत त्यांनी खोचक टीका करत सल्ला दिला आहे.