'ठाकरे गटात फक्त तीनच लोकं राहतील', नवनीत राणांचा दावा

‘ठाकरे गटात फक्त तीनच लोकं राहतील’, नवनीत राणांचा दावा

| Updated on: Jan 14, 2023 | 1:45 PM

शिक्षक-पदवीधर निवडणुकांबाबत आमरावती खासदार नवनीत राणा यांचा मोठा दावा, काय म्हणाल्या बघा...

येत्या ३० जानेवारी रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागेसाठी निवडणूक होत आहे, यावर प्रतिक्रिया देताना आमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. राज्यातील सर्व पाचही जागा भाजप व शिंदे गटाच्या विजयी होतील, असा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात फक्त तीनच लोकं राहतील, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

मकर संक्रातीनिमित्त नवनीत राणा यांनी पंतग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी त्या म्हणाल्या, यंदाची मकरसंक्रात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत देवांचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी आहेत आणि त्यांचे कष्ट संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

Published on: Jan 14, 2023 01:45 PM