नवनीत राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, 'त्या' वक्तव्यावरून टीका अन् महायुतीच्या नेत्यांची सारवासारव

नवनीत राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, ‘त्या’ वक्तव्यावरून टीका अन् महायुतीच्या नेत्यांची सारवासारव

| Updated on: Apr 17, 2024 | 11:22 AM

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवनीत राणांनी अमरावतीचं तिकीट मिळवलं. मात्र त्यांच्याच एका विधानाने विरोधकांना टीका करण्याची आयती संधी दिलीये. मोदींची हवा आहे, या भ्रमात राहू नका, असं समर्थकांना सांगताना नवनीत राणा दिसताय. हाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महायुतीचे नेते सारवासारव करताय...

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचं एक विधान सध्या चर्चेत आलंय. इतकंच नाहीतर ते वादातही आहे. मोदींची हवा आहे, या भ्रमात राहू नका… नवनीत राणांचं विधान चर्चेत आलंय. २०१९ मध्ये मीच अपक्ष म्हणून जिंकले, नवनीत राणांच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्यात. तर विरोधकांकडून होणाऱ्या टिकेनंतर विधानाचा विरर्यास झाल्याचा दावा नवनीत राणांनी केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवनीत राणांनी अमरावतीचं तिकीट मिळवलं. मात्र त्यांच्याच एका विधानाने विरोधकांना टीका करण्याची आयती संधी दिलीये. मोदींची हवा आहे, या भ्रमात राहू नका, असं समर्थकांना सांगताना नवनीत राणा दिसताय. हाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महायुतीचे नेते सारवासारव करतांना दिसताय. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष असतानाही विजय मिळवला असल्याचा संदर्भ देत हे विधान केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा आहे. बघा नेमकं काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

Published on: Apr 17, 2024 11:22 AM