मोदींची हवा होती, आहे आणि.... 'त्या' वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण देत विरोधकांवर घणाघात

मोदींची हवा होती, आहे आणि…. ‘त्या’ वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण देत विरोधकांवर घणाघात

| Updated on: Apr 16, 2024 | 5:28 PM

आम्ही मोदींच्या नावाने लोकांकडे जात आहे. मोदी यांची हवा होती, आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. देशाच्या विकासाठी मोदी पाहिजे आहे, असं स्पष्ट मत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केलाय. पुढे नवनीत राणा असंही म्हणाल्या की, चंद्रशेखर बावनकुळे आमचे नेते आहे. त्यांच्या बाबतीतही...

माझा व्हिडीओ एडिट करून विरोधक बातम्या पेरत आहे.. आम्ही मोदींच्या नावाने लोकांकडे जात आहे. मोदी यांची हवा होती, आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. देशाच्या विकासाठी मोदी पाहिजे आहे, असं स्पष्ट मत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केलाय. पुढे नवनीत राणा असंही म्हणाल्या की, चंद्रशेखर बावनकुळे आमचे नेते आहे. त्यांच्या बाबतीतही विरोधकांनी व्हिडिओ एडिट केला. बावनकुळे आमचे नेते आहेत. मी जे बोलली होती ते मी अचलपूर मधील एका आमदाराबद्दल बोलली होती . ते माझ्या मुलाबद्दल आणि पतीबद्दल बोलले होते. विरोधकांनी सर्व यंत्रणा केरण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हितासाठी बोललं पाहिजे. विरोधकांनी गलिच्छ राजकारण करू नये, असा सल्लाही नवनीत राणांनी विरोधकांना दिला. तर मी मोदींच्या नावाने प्रत्येक ठिकाणी जाऊन मत मागत आहे. देशाच्या हितासासाठी मतदान करा, असे आवाहन करत असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 16, 2024 05:28 PM