15 सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की… नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज

15 सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की… नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज

| Updated on: May 09, 2024 | 4:27 PM

नवनीत राणांच्या विधानामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

हैदराबाद येथे भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा दाखल झाल्या होत्या. यावेळी नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंना आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. नवनीत राणांच्या विधानामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ 15 सेकंद पुरेसे ठरतील, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले आहे. माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा बुधवारी हैदराबादमध्ये होत्या. यावेळी त्यांनी स्थानिक खासदार असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या भावावर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवेसीने हे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. 15 मिनिटासाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही दाखवून देऊ, कोणात किती दम आहे असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते.

Published on: May 09, 2024 04:27 PM