‘ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी फडणवीसांबद्दल बोलू नये’, भाजप महिला नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
आज मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या टीकेवरून नवनीत राणांनी पलटवार केला आहे. बघा काय म्हणाल्या नवनीत राणा?
ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलू नये, असे वक्तव्य अमरावतीच्या भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, ‘मला एवढंच कळतंय, जे जगात हुशार आहे. जगातील लोकांनी पाहिलले आहेत, अशा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही. त्यांनी बोलू नाही. त्यांचा स्वतःच्या डोक्यातच मेंदू नाही’, असे म्हणत नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. शरद पवार यांच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदासाठीची तीन नावं डोक्यात आहेत. ती मला माहिती आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांच्या डोक्यात काय आहे, हे जर देवेंद्र फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची ही अवस्था नसती, असं संजय राऊत म्हणालेत. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का? हे त्यांना कोणी सांगितलं. पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात… पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना आधी कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.