‘गधों की काउंटिंग कोई नहीं करता, मैदान में…’, नवनीत राणा यांचा विरोधकांना टोला
माझी सर्व काळजी विरोधक करत आहे. निवडणुकीत तुम्ही माझा पराभव होऊ देणार आहे का? माझ्या जीवनाची काळजी माझे विरोधकच घेत आहे, असे म्हणत अमरावती खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांवरच निशाणा साधला आहे.
अमरावती, ११ मार्च २०२४ : निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी सगळे नेते एकत्र आले आहेत. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे. निवडणुकीत तुम्ही माझा पराभव होऊ देणार आहे का? माझ्या जीवनाची काळजी माझे विरोधकच घेत आहे, असे म्हणत अमरावती खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांवरच निशाणा साधला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, माझा पाय फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा माझे विरोधक डॉक्टरांना फोन करून विचारायचे हे खरं आहे की खोटं आहे. देवाने मला काळजीमुक्त केलं आहे. माझी सर्व काळजी विरोधक करत आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद, असे म्हणत नवनीत राणा यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. गधों की काउंटिंग कोई नहीं करता, मैदान में दौड़ने वाले घोडों की ही काउंटिंग होती है,असे म्हणत त्यांनी सूचक वक्तव्यही केले आहे. तर आम्ही विरोधकांना दाखवून दिलं आहे की आम्ही घोड्यासारखे धावणारे लोकं आहोत थांबणारे लोकं नाहीत, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.