‘जर विरोधकांना मला पाडायचं होतं तर…’, रवी राणांच्या सभेत नवनीत राणा भावूक, विरोधकांवर निशाणा
विधानसभेचंं बिगूल वाजल्यानंतर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, त्यांची फॉर्म भरण्यासाठी लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सहा पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज भरता येणार आहे. अमरावतीमध्ये रवी राणा यांनी देखील आपला अर्ज भरला.
आमदार रवी राणा यांनी आज बडनेरा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी रवी राणा यांच्या सभेत बोलत असताना नवनीत राणा या भावूक झाल्याचे पहायला मिळाले. विरोधकांनी खोटा प्रचार करून मला पाडलं असं नवनीत राणा म्हणाल्या. ‘जर विरोधकांना मला पाडायचं होतं तर खरे मुद्दे मांडून मला पाडायचं होतं. आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन खोटा प्रचार करून आमच्या वर्गाला मतांचं विभाजन करून माझा पराभव केला.’, असं म्हणत विरोधकांवर नवनीत राणांनी हल्लाबोल केला. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘माझं सगळ्या मतदारांना हात जोडून विनंती करते, विधानसभा निवडणुकीत मतांचं विभाजन होऊ देऊ नका. रवी राणा यांच्यासारखा माणूस बडनेरा मतदारसंघात आपल्याला लाभणार नाही. त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवा आणि पाठिशी उभं रहा’, असं आवाहन करत असताना नवनीत राणा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.