संभाजी भिडे ८ दिवसांत पोलिसांसमोर येणार, 'त्या' क्लिपची चौकशी होणार, काय आहे प्रकरण?

संभाजी भिडे ८ दिवसांत पोलिसांसमोर येणार, ‘त्या’ क्लिपची चौकशी होणार, काय आहे प्रकरण?

| Updated on: Aug 04, 2023 | 7:55 AM

VIDEO | महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात, अमरावती पोलिसांकडू भिडे यांना नोटीस...नोटीशीला काय देणार संभाजी भिडे उत्तर?

मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ | महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संभाजी भिडे यांच्यावर कारवाईला सुरूवात झाली आहे. ८ दिवसांत पोलिसांसमोर या, अशी नोटीस संभाजी भिडे यांनी अमरावती पोलीस यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता संभाजी भिडे यांना पोलिसासमोर आपली बाजी मांडावी लागेल. महापुरूषांबद्दल केलेले अपमानास्पद वक्तव्य, याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकलंय, ८ दिवसांत पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हा, अशी नोटीस संभाजी भिडे यांना अमरावती राजापेठ पोलिसांनी बजावली आहे. महात्मा गांधी, महात्मा फुले आणि साईबाबा यांबाबत केलेल्या वक्तव्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे. तर ८ दिवसांत भिडे यांना अमरावती पोलिसांसमोर रहावे लागणार आहे. तर भिडे यांच्या पुढील सर्व कार्यक्रमाच्या परवानग्या नाकारण्यात आल्या..त्यामुळे आता या नोटीशीला भिडे काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 04, 2023 07:55 AM