अमरावती लोकसभेच्या तिकीटावरून तिढा कायम, महायुतीतून नवनीत राणा की आनंदराव अडसूळ?

अमरावती लोकसभेच्या तिकीटावरून तिढा कायम, महायुतीतून नवनीत राणा की आनंदराव अडसूळ?

| Updated on: Mar 22, 2024 | 12:27 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचा निकाल अद्याप लागला नसल्याने त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे अडसूळ यांनी म्हटलं आहे. अडसूळ यांनी केलेल्या वक्तव्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.

अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीच्या तिकीटावरून महायुतीतील तिढा कायम आहे. अमरावतीत तिकीट वाटपात उलटफेर होणार? राणांचं जात प्रमाणपत्राचा निकाल अद्याप लागला नसल्याने त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे अडसूळ यांनी म्हटलं आहे. अडसूळ यांनी केलेल्या वक्तव्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे. अमरावती लोकसभेच्या जागेवरून बाजी पटलण्याची शक्यता आहे. नवनीत राणा आणि अडसूळ हे दोघेही अमरावतीतून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये भाजपचा उमेदवार असेल हे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. तर रवी राणा नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट मिळणार असल्याचा दावा केला. तर आनंदराव अडसूळ काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. दरम्यान आज अडसूळ पिता-पुत्र यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांची भेट घेतली. तर दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचीही माहिती मिळतेय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 22, 2024 12:27 PM