Pravin Darekar | 'चोराच्या उलट्या बोंबा', नवाब मलिकांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

Pravin Darekar | ‘चोराच्या उलट्या बोंबा’, नवाब मलिकांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

| Updated on: Nov 15, 2021 | 6:58 PM

भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. रजा अकादमीच्या कार्यक्रमात उद्धवजी ठाकरे यांचं रजा अकादमीचे मोमेन स्वागत करत आहेत. मग यावरून, तुमचे रजा अकादमीशी संबंध आहेत असं आम्ही म्हणायचं का? हे सरकार सत्ता टिकवण्यासाठी लाचार झालेले आहे आणि त्यातूनच संजय राऊत अशाप्रकारची वक्तव्यं करत आहेत, असं दरेकर म्हणाले.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात झालेल्या दंगलीवरून भाजवर गंभीर आरोप केले. आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसले होते. त्यांची रझा अकादमीच्या नेत्यांशी मिटिंग झाली. माझ्याकडे एक फोटो आहे. हा सुद्धा षडयंत्राचा हिस्सा होता की नाही माहीत नाही. पण राज्यात रझा अकादमीची ताकद नाही. त्यांचे काही मौलाना शहरात फिरत असतात. मात्र, राज्यात दंगल भडकवतील एवढी त्यांची ताकद नाही. पण त्यांच्या कार्यालयात बसून शेलार मिटींग करत होते. त्याची चौकशी होईल. सर्व दंगल करणाऱ्यांना अटक करण्यात येईल, असं मलिक म्हणाले.

त्यावर भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. रजा अकादमीच्या कार्यक्रमात उद्धवजी ठाकरे यांचं रजा अकादमीचे मोमेन स्वागत करत आहेत. मग यावरून, तुमचे रजा अकादमीशी संबंध आहेत असं आम्ही म्हणायचं का? हे सरकार सत्ता टिकवण्यासाठी लाचार झालेले आहे आणि त्यातूनच संजय राऊत अशाप्रकारची वक्तव्यं करत आहेत, असं दरेकर म्हणाले.

मलिकांच्या आरोपाला भाजप आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. ‘नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन 2016 -17च्या फोटोचं संबंध काय? माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका’, अशी टीका शेलार यांनी केलीय.