Special Report | राणे - ठाकरे वादात अमृता फडणवीसांची उडी

Special Report | राणे – ठाकरे वादात अमृता फडणवीसांची उडी

| Updated on: Aug 26, 2021 | 10:02 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरु असलेल्या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतलीय. अमृता फडणवीस यांना या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. 'जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपडत असते तेव्हा तो खरा राजा नसतो', अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी सातत्याने महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरु असलेल्या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतलीय. अमृता फडणवीस यांना या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. ‘जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपडत असते तेव्हा तो खरा राजा नसतो’, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी सातत्याने महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेनेचे नेत्या मनिषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते हे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात काल परवापर्यंत एक नंबरवर होते. परंतु ती जागा आता नारायण राणे घेऊ पाहत आहेत. त्यामुळे आम्हाला चिंता वाटतेय. त्यामुळे अमृता वहिनी यांनी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा कसे एक नंबरला येतील यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला कायंदे यांनी लगावलाय.