अमुल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले; उद्यापासून लागू होणार नवे दर

अमुल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले; उद्यापासून लागू होणार नवे दर

| Updated on: Aug 16, 2022 | 3:07 PM

अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. नव्या वाढीव किंमती या उद्यापासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार अधिक वाढला आहे.

अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. नव्या वाढीव किंमती या उद्यापासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार अधिक वाढला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. यासोबतच मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली आहे. नवीन दर उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्ट 2022 पासून लागू होतील. अमूल दुधाच्या किमतीतील ही वाढ गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र व्यतिरिक्त दिल्ली आणि एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि  अमूलची उत्पादने विकल्या जाणाऱ्या इतर सर्व ठिकाणी लागू होईल.

Published on: Aug 16, 2022 03:07 PM