आमदार किशोर पाटील यांच्याकडून पत्रकाराला शिवीगाळ अन् धमक्या, काय आहे प्रकरण?

आमदार किशोर पाटील यांच्याकडून पत्रकाराला शिवीगाळ अन् धमक्या, काय आहे प्रकरण?

| Updated on: Aug 06, 2023 | 9:22 AM

VIDEO | आमदारांना ही भाषा शोभते का? कुणाकडून पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ अन् धमक्या, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | पत्रकारानं मुख्यमंत्र्यांसाठी वापरलेल्या एका शब्दामुळे शिवसनेच्या शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एका स्थानिक पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगावातील एका पत्रकाराला अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ कोणी गावगुंड करत नाही तर महाराष्ट्रातील एक आमदार देत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतेय. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिंदे गटाचे किशोर पाटील हे आमदार आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली. या प्रकरणावरुन संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी मोर्चा काढला तर मुख्यमंत्र्यांनी फोनवरून त्या पिडीत मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दोषींना शिक्षा देण्याचे आश्वासन दिलं. मात्र सांत्वनापलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचं आश्वासन द्यायला हवं होतं. असं स्थानिक पत्रकाराला वाटलं आणि त्यानं जनतेची संतप्त भावना आणि मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी अशा शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली. मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी हा शब्द पत्रकारानं वापरल्यानं किशोर पाटील यांनी संताप आला आणि त्यांनी शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं.

Published on: Aug 06, 2023 09:10 AM