Mumbai | Ajit Pawar, Dhananjay Munde, Hasan Mushrif सिल्व्हर ओकवर दाखल
या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे देखील शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे देखील शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.
Latest Videos