मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरेंसह आनंद दिघेंचीही प्रतिमा! अखेर शिंदेनी पदभार स्वीकारला
मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, आनंद दिघे यांचा फोटो आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आलाय. पदभार स्वीकारण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या सगळ्यांना अभिवादन केलंय.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचत राज्यात शिंदे सरकार आलं आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकलाय. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी हुतात्मा स्मारक, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवतीर्थावर (Shivtirtha) जात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. तसंच ठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीचंही दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतलं. शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरात आरती केली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार (Chief Minister Eknath Shinde) स्वीकारलाय. यानिमित्तानं मंत्रालयातलं सीएम कार्यालय सजविण्यात आलं होतं. मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, आनंद दिघे (Anand Dighe) यांचा फोटो आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आलाय. पदभार स्वीकारण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या सगळ्यांना अभिवादन केलंय.