MPSC | MPSC च्या भरतीत 100 जागांची वाढ, एमपीएससी उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण

| Updated on: Oct 08, 2021 | 7:27 PM

आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. आता एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाच वातावरण आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.