अरररर बाप…. पुण्यात बांधकाम सुरु असलेली इमारत एका बाजूला झुकली अन्…
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून धक्कादायक बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत एका बाजूला झुकली...वाय आकाराच्या दोन पिलरवर उभी असलेली ही तीन मजली इमारत झुकल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
पुणे, (पिंपरी चिंचवड) १४ फेब्रुवारी २०२४ : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून धक्कादायक बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत एका बाजूला झुकली आहे. त्यामुळे वाकड परिसरात असणारी ही इमारत कधी कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही इमारत एका बाजूला झुकल्याने तिला जमीन दोस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. पिंपरी चिंचवड मधील वाकड या ठिकाणी बांधकाम सुरू असलेले इमारत अखेर महापालिकेने पाडायला सुरुवात केली आहे. वाय आकाराच्या दोन पिलरवर उभी असलेली ही तीन मजली इमारत झुकल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केल्यानंतर ती पाडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ती इमारत पाडायला सुरुवात करण्यात आलेली आहे.
Published on: Feb 14, 2024 02:41 PM
Latest Videos