राणा दाम्पत्याची आनंद अडसूळ यांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण…
राणा दाम्पत्याला अक्कल नाही. १७ रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाली का? असा सवाल करत आनंद अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आनंद अडसूळ म्हणाले, लोकांनी राणा दामप्त्याला बंटी-बबली नावं दिलं ती....
राजकारण सोडेल पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही. राणा दाम्पत्याला अक्कल नाही. १७ रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाली का? असा सवाल करत आनंद अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आनंद अडसूळ म्हणाले, लोकांनी राणा दामप्त्याला बंटी-बबली नावं दिलं ती योग्यच आहे, असे खोचकपणे म्हणत त्या पती-पत्नीस खरच अक्कल आहे की नाही, हा माझा प्रश्न आहे. त्यांना नैतिकता नाहीच, पण अक्कल नाही, असा हल्लाबोल आनंद अडसूळ यांनी केला. अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजप आणि महायुतीची उमेदवारी मिळाली. त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांच्यासह आनंद अडसूळ यांचा विरोध कायम आहे. बघा काय म्हणाले आनंद अडसूळ….
Published on: Apr 17, 2024 05:49 PM
Latest Videos