Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Siddhivinayak Dress Coade Video : 'तृप्तीताई शांत रहा, धर्मात लुडबुड करू नका', तृप्ती देसाई यांना कोणाचा सल्ला?

Siddhivinayak Dress Coade Video : ‘तृप्तीताई शांत रहा, धर्मात लुडबुड करू नका’, तृप्ती देसाई यांना कोणाचा सल्ला?

| Updated on: Jan 29, 2025 | 5:18 PM

सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून लागू करण्यात आलेल्या या नियमाला सामाजिक कार्यकर्त्या तसेच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंचा विरोध

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी नुकताच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावेत, असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून भाविकांना करण्यात आलं आहे. दरम्यान, सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून लागू करण्यात आलेल्या या नियमाला सामाजिक कार्यकर्त्या तसेच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मात्र हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा. संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. जो कोणी मंदिरात येतो तो श्रद्धेने येत असतो. त्याचे कपडे न पाहता त्याची श्रद्धा पाहिली पाहिजे, असे म्हणत सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात आहेत. मग हा निर्णय मग फक्त भक्तांनाच लागू आहे का? असा सवालही त्यांनी केला. यानंतर तृप्ती देसाईंना हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्याकडून इशारा देण्यात आला आहे. ‘कोणत्या मंदिरात कोणी काय परिधान करावे, कस राहावे हे ठरवण्याचे अधिकार त्या त्या देवस्थानांना असतात. तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही त्यात पडू नका. सिद्धिविनायक देवस्थान ने जे काही ठरवलं आहे तो त्यांचा अधिकार आहे आणि तसे नियम आवश्यकच आहेत. तुम्ही त्यात ढवळा ढवळ करू नका’, असे दवे म्हणाले तर तृप्तीताई शांत रहा, धर्मात लुडबुड करू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी तृप्ती देसाई यांना दिला.

Published on: Jan 29, 2025 05:18 PM