बारामती ते कल्याण... महायुतीत खटके उडण्यास सुरूवात, दादांच्या गटातील नेत्याची शिंदे गटाला धमकी

बारामती ते कल्याण… महायुतीत खटके उडण्यास सुरूवात, दादांच्या गटातील नेत्याची शिंदे गटाला धमकी

| Updated on: Mar 13, 2024 | 11:24 AM

शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करताना बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात अपक्ष लढण्याची भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवार गटातील नेते आनंद परांजपे यांची शिंदे गटाला धमकी

मुंबई, १३ मार्च २०२४ : विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करताना बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात अपक्ष लढण्याची भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवार गटातील नेते आनंद परांजपे यांनी शिंदे गटाला धमकीच दिली. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा वेगळा निकाल लागेल, असे आनंद परांजपे यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी नालायकपणाचा कळस गाठला म्हणत बारामतीत दोन्ही पवारांच्या विरोधात लढणार अशी घोषणाच विजय शिवतारे यांनी केली. शिंदे गट विरुद्ध अजित पवार गटात खटके उडण्यास सुरूवात झाली. तर विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं नाहीतर कल्याणमध्ये वेगळा निकाल लागू शकतो, अशी धमकी अजित दादांच्या राष्ट्रवादीतील नेते आनंद परांजपे यांनी दिली. बघा नेमकं काय घडलं? काय आहे वाद?

Published on: Mar 13, 2024 11:24 AM