अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ तर शाहरुख-रणवीरसह मित्रांना 'इतक्या' कोटींची भेट

अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ तर शाहरुख-रणवीरसह मित्रांना ‘इतक्या’ कोटींची भेट

| Updated on: Jul 14, 2024 | 2:18 PM

Anant Ambani and Radhika Merchant Wedding Gift : एका घड्याळ्याची किंमत तब्बल २ कोटी रूपये इतकी आहे. इंस्टाग्रामवरील इंडीयन होरोलॉजी पेजने हा दावा केला आहे. अनंत अंबानीने शाहरुख खान, सलमान खान आणि रणवीरसह २५ मित्रांना रिटर्न गिफ्ट म्हणून १८ कॅरेट सोन्याचे घड्याळ भेट म्हणून दिले आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटसोबत शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. मुंबईत या दोघांनीही १२ जुलैला मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नाला भव्यदिव्य करण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. इतकेच नाहीतर अनंत अंबानीने त्याच्या मित्रांना दिलेल्या रिटर्न गिफ्टचे फोटोही सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अनंत अंबानीकडून त्यांच्या मित्रांना कोटींची घड्याळं भेट म्हणून देण्यात आली आहे. एका घड्याळ्याची किंमत तब्बल २ कोटी रूपये इतकी आहे. इंस्टाग्रामवरील इंडीयन होरोलॉजी पेजने हा दावा केला आहे. अनंत अंबानीने शाहरुख खान, सलमान खान आणि रणवीरसह २५ मित्रांना रिटर्न गिफ्ट म्हणून १८ कॅरेट सोन्याचे घड्याळ भेट म्हणून दिले आहे. ज्यांची किंमत तब्बल २ कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Jul 14, 2024 02:18 PM