‘मुंब्रा शांत आहे शांत राहूदे’, स्थानिकांचा मराठी तरूणाला घेराव अन् शिवीगाळ; मुंब्र्यात नेमकं काय घडलं?
एक मराठी तरुण मुंब्र्यातील एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना भाषेवरुन वाद झाला. मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावरुन वाद झाला.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात मराठी आणि हिंदी भाषेवरुन इतका वाद झाला की, मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडण्यात आलं. फळविक्रेताला मराठी का येत नाही? विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. विशेष म्हणजे मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली. काल मुंब्र्यात मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग आला. तर मराठी बोल म्हणून सांगितल्याने मुंब्र्यात मराठी माणसालाच माफी मागण्यास सांगितलं. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा यायलाच हवी, असं मराठी तरूणानं म्हटलं. यानंतर मुंब्र्यात मराठी- हिंदी वाद का करतो?, असा स्थानिकांचा सवाल केलाय. मराठी तरूणाला जमावाने शिवीगाळ केली. माफी मागण्यास सांगितली. तर स्थानिकांनी या मराठी तरूणाला पोलीस स्टेशनला देखील नेलं आणि तक्रार केली. दरम्यान, मुंब्रा शांत आहे शांत राहूदे असं म्हणत स्थानिकांनी मराठी तरूणालाच घेराव घातला.