Kunal Patil | कल्याण मलंगगड रस्ता बंद करणार, कुणाल पाटील यांचा प्रशासनाला इशारा
केडीएमसीकडे तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने साचलेल्या पावसाच्या पाण्यात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह संतप्त नागरीकांनी ठिय्या आंदोलन केले.
कल्याण : गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळेआडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी रस्त्यात साचले आहे. नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे. केडीएमसीकडे तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने साचलेल्या पावसाच्या पाण्यात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह संतप्त नागरीकांनी ठिय्या आंदोलन केले. केडीएमसीच्या विरोधात घोषणाबाजी करीत केडीएमसी प्रशासनाचा निषेध केला. केडीएमसीने दखल घेतली नाही तर कल्याण शील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे.
Latest Videos