संजय शिरसाट म्हणाले बाळासाहेबांची चप्पलही लाखमोलाची तर राजन साळवी म्हणाले खूर्चीची किंमत करणं म्हणजे...

संजय शिरसाट म्हणाले बाळासाहेबांची चप्पलही लाखमोलाची तर राजन साळवी म्हणाले खूर्चीची किंमत करणं म्हणजे…

| Updated on: Feb 02, 2024 | 5:10 PM

एसीबीने बाळासाहेब ठाकरे यांच्या खूर्चीची आणि फोटोची किंमत ठरवली. एसीबीने बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीची किंमत ठरवणं हे दुर्देवी असल्याचे म्हणत राजन साळवी यांनी एसीबीच्या कारवाईनंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी सुरू आहे. यामध्ये राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, एसीबीकडून झालेल्या कारवाईनंतर राजन साळवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एसीबीने बाळासाहेब ठाकरे यांच्या खूर्चीची आणि फोटोची किंमत ठरवली. एसीबीने बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीची किंमत ठरवणं हे दुर्देवी असल्याचे म्हणत राजन साळवी यांनी एसीबीच्या कारवाईनंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीला किंमत लावणार हे सरकारी कर्मचारी आहेत, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले. दरम्यान, आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची चप्पल सुद्धा लाखमोलाची आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले. राजन साळवी यांनी एसीबीच्या कारवाईवर दिलेल्या संतप्त प्रतिक्रियेनंतर संजय शिरसाट यांनी हे उत्तर दिलंय.

Published on: Feb 02, 2024 05:09 PM