“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याची दानत नव्हती”, भाजप खासदाराची टीका

| Updated on: Jul 10, 2023 | 3:29 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे आज अमरावतीत आले आहेत. अमरावतीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली आहे.

अमरावती: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे आज अमरावतीत आले आहेत. अमरावतीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अमरावतीला द्यायला त्यांनी दानत नव्हती. उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री असताना काहीच दिले नाही सगळे काम थांबविले . शरद पवार हातात सत्ता नसते तेव्हाच विदर्भाला भेट देतात. यशोमती ठाकूर या पालकमंत्री होत्या मात्र आता त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोजरी विकास आराखड्यासाठी शंभर कोटींची मागणी करत आहेत.”

Published on: Jul 10, 2023 03:29 PM
उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हा मतदारांचा कौल …”
खातेवाटात शिंदे गटाचा दबाव? राऊत म्हणतात, ‘शिंदे गटच वैफल्यग्रस्त’