Ankush Kakade | विदर्भ काय तुमच्या बापाचा आहे का? अनिल बोंडेंच्या वक्तव्यावर अंकुश काकडेंचा सवाल
शरद पवारांच्या विदर्भ दौऱ्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमने-सामने आले आहेत. शरद पवार यांनी विदर्भ आणि अमरावतीच्या दौऱ्यावर येऊ नये, असं म्हणत भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पवारांच्या दौऱ्याला विरोध केलाय. तर विदर्भ काय अनिल बोंडे यांच्या बापाचा आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी केलाय.
भाजपच्या गडात सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अशावेळी पवारांच्या विदर्भ दौऱ्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमने-सामने आले आहेत. शरद पवार यांनी विदर्भ आणि अमरावतीच्या दौऱ्यावर येऊ नये, असं म्हणत भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पवारांच्या दौऱ्याला विरोध केलाय. तर विदर्भ काय अनिल बोंडे यांच्या बापाचा आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी केलाय.
शरद पवार यांनी अमरावती आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येऊ नये. पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करत आहेत माहिती नाही. त्यांनी अमरावतीमध्ये येऊच नये. त्यांना संतप्त शेतकरी आणि नागरिक जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. विदर्भात फिरताना त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी, अशा शब्दात अनिल बोंडे यांना पवारांच्या दौऱ्यावर टीका केलीय.
अनिल बोंडे यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विदर्भ काय तुमच्या बापाचा आहे का? शरद पवार महाराष्ट्रात कुठेही फिरू शकतात. भाजपला राज्यातील वातावरण बिघडवायचं आहे. एका माजी मंत्र्याला असं वक्तव्य शोभा देत नाही, अशा शब्दात काकडेंनी बोंडे यांना उत्तर दिलं आहे.