Anil Desai : नवी चर्चा निर्माण व्हावी म्हणून संजय राऊतांवर कारवाई, खासदार अनिल देसाईंचा आरोप
शिवसेना हा पक्ष कधी संपत नाही, तो एक विचार आहे. गेल्या काही वर्षापासून त्यांच्या कर्तुत्वाने जगाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे,' असं खासदार अनिल देसाई म्हणालेत.
मुंबई : ‘सध्या केंद्रीय संस्थांचा कसाही वापर केला जात असला तरी आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. संजय राऊतांवर कशा प्रकारे आणि का कारवाई झाली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. केवळ राज्यपालांचे वक्तव्य बाजूला पडावे आणि नवी चर्चा निर्माण व्हावी म्हणून संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे,’ अशी टीका खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी केली आहे. यावेळी देसाईंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा झंजावत दौरा सबंध महाराष्ट्र पाहत आहेत. त्यामुळे त्यांना ओळख करुन द्यायची गरज नाही पण आपले अस्तित्व काय आहे? याचा जरा विचार (Tanaji Sawant) तानाजी सावंत यांनी करावा असा टोला (Shiv sena) शिवसेनेचे अनिल देसाई यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरेंच काम फक्त मुंबईनं नाही तर जगानं पाहिलंय असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टिका केली आहे. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातु असल्याचेही देसाई यांनी सांगितले.