Anil Deshmukh | अनिल देशमुख ईडी कार्यालयाकडे रवाना, थेट LIVE UPDATE

Anil Deshmukh | अनिल देशमुख ईडी कार्यालयाकडे रवाना, थेट LIVE UPDATE

| Updated on: Jun 26, 2021 | 12:40 PM

100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना (Anil Deshmukh PA) ईडीने (ED) अटक केली आहे.

100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना (Anil Deshmukh PA) ईडीने (ED) अटक केल्यानंतर, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.  ईडीने अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहायचं होते. दरम्यान अनिल देशमुख ईडी कार्यालयाकडे रवाना झाले असून पुढील कारवाईबद्दल काय अपडेट येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.