Anil Deshmukh यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

| Updated on: Jan 20, 2022 | 6:02 PM

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेमार्फत डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान बारमालकांकडून खंडणी वसुली करण्यात आली आहे. हा पैसा वाझेने देशमुखांना दिला होता. देशमुखांनी या पैशाचा वापर आपल्या व्यवसायासाठी केल्याचा आरोप ईडीने लावलेला आहे.

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. 100 कोटींची वसूली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Extortion and money laundering Case) अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody Extended) 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांना आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार आहेत. देशमुख सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. यापूर्वी मुंबईच्या विशेष न्यायालयानेही त्यांना दिलासा दिला नव्हता. 100 कोटींची वसुली आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांना अटक केली होती. मुंबईच्या विशेष न्यायालयाने 18 जानेवारी रोजी त्यांची डिफॉल्ट याचिका फेटाळून लावली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी देशमुखांना दिलासा मिळू शकला नाही. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेमार्फत डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान बारमालकांकडून खंडणी वसुली करण्यात आली आहे. हा पैसा वाझेने देशमुखांना दिला होता. देशमुखांनी या पैशाचा वापर आपल्या व्यवसायासाठी केल्याचा आरोप ईडीने लावलेला आहे.