अनिक्षाच्या अटकेनंतर फरार बुकी अनिल जयसिंघानी यांचा मोठा खुलासा, Exclusive काय म्हणाले बघा

अनिक्षाच्या अटकेनंतर फरार बुकी अनिल जयसिंघानी यांचा मोठा खुलासा, Exclusive काय म्हणाले बघा

| Updated on: Mar 18, 2023 | 6:01 PM

VIDEO | अनिक्षा जयसिंघानी हिला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी, वडील अनिल जयसिंघानी यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया देताना केला मोठा खुलासा

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला धमकावल्याचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली असून अनिक्षा २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. दरम्यान, अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील अनिल जयसिंघानी यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला आणि त्यांनी गंभीर आरोप केलेत. ‘मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिच्या अटकेनंतर अनिल जयसिंघानी यांनी खुलासा केला. आमच्यावर अन्याय झालाय. मी काही बोलल्यास मुलीला कोठडीत त्रास होईल, असं अनिल जयसिंघानी यांनी म्हटलं आहे. माझ्या मुलीवर केलेली केस पूर्णपणे बोगस आहे.’ असे म्हणत अनिल जयसिंघानी याने मोठा खुलासा केला आहे. तर अनिक्षाला पोलीस कोठडीच्या बाहेर येऊ द्या. दूध का, दूध पाणी का पाणी होईल. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल. माझी प्रकृती बरी नाही. संध्याकाळी फोन करा. माझं वयही झालं आहे. मी पेपर पाठवेन. आमच्यासोबत अन्याय होतोय. हे सर्व भगवान पाहत आहे, असेही अनिल जयसिंघानी याने म्हटलं आहे.

Published on: Mar 18, 2023 06:01 PM