Anil Parab : अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत, नियोजित कामासाठी बाहेर असल्याची माहिती
शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीनं समन्स बजावलंय. चौकशीसाठी परब यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. साई
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आज ईडी (ED) चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे. त्यांच्या नियोजित कामासाठी परब आज मुंबईच्या (Mumbai) बाहेर आहेत. त्यामुळे ते ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे. परिवहन मंत्री अनिल परब दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अडचणीत आले आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीनं समन्स बजावलंय. चौकशीसाठी परब यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. साई रिसॉर्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु असून यासंदर्भात ईडीनं सात ठिकाणी छापेमारी केली आहे. अनिल परब यांचे घर, कार्यालय, साई रिसॉर्ट आणि परब यांचे निकटवर्तीय यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर परब यांना ईडीनं नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
Published on: Jun 15, 2022 11:06 AM
Latest Videos