VIDEO : Mumbai | अनिल परब संजय राऊतांच्या भेटीला
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठीच मंत्र्यांना नोटीसा पाठवल्या जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. ईडीकडून नोटीस आल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भेटीला गेले आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठीच मंत्र्यांना नोटीसा पाठवल्या जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. ईडीकडून नोटीस आल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भेटीला गेले आहेत. हे भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमच्या घरीही अशा नोटीस आल्या. परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. ते मंत्री आहेत त्यापेक्षा ते शिवसैनिक आहेत. शिवसेना कमजोर होईल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेल्या डोमकावळ्यांचा फायदा होईल असं होणार नाही. असे घाव आम्ही पचवले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
Latest Videos