Anil Parab: 'मविआ'च्या आणखी एका मंत्र्यावर ईडी कारवाई, सात ठिकाणी छापेमारी

Anil Parab: ‘मविआ’च्या आणखी एका मंत्र्यावर ईडी कारवाई, सात ठिकाणी छापेमारी

| Updated on: May 26, 2022 | 10:59 AM

अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं.

मुंबई : अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून (ED) आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे.  तसेच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं. याच्या आगोदर देखील अनिल ईडीने चौकशी केली आहे. तसेच त्यांच्यासोबत आरटीओच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली होती.

Published on: May 26, 2022 10:59 AM