Anil Parab | एसटी कामगारांनी राजकारणाला बळी पडू नये : अनिल परब
लोकांची गैरसोय चालू ठेवून काही उपयोग होणार नाही. सरकार चर्चा करायला तयार आहे. पण ही पद्धत नाही. कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला हा संप आहे, असं अनिल परब म्हणाले.
कामगारांनी पहिल्यांदा संप मागे घ्यावा. लोकांची गैरसोय होत आहे. एसटीच्या विलनीकरणाची त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांना कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे स्थापन झालेल्या समितीसमोरच ही मागणी मांडावी लागणार आहे, असं अनिल परब म्हणाले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसारच आम्ही संपकऱ्यांवर कारवाई करत आहोत. कोर्टाच्या आदेशाने आम्हाला जसं बंधन आहे. तसंच त्यांनाही बंधन आहे. कामगारांच्या इतर सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात पगारवाढीची मागणी सोडून त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. उरलेल्या मागण्यांबाबत चर्चा करायची असेल तर संप मागे घ्यावा लागेल. लोकांची गैरसोय चालू ठेवून काही उपयोग होणार नाही. सरकार चर्चा करायला तयार आहे. पण ही पद्धत नाही. कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला हा संप आहे, असं ते म्हणाले.
Latest Videos