अनिल परब कोकणचा नाही केरळचा वाटतो, ST संपावरुन Narayan Rane यांचा हल्लाबोल

अनिल परब कोकणचा नाही केरळचा वाटतो, ST संपावरुन Narayan Rane यांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 22, 2021 | 10:02 PM

एसटी कामगारांच्या संपावरुन नारायण राणे यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल परब मला कोकणचा नव्हे केरळचा वाटतो, असं वक्तव्य राणे यांनी केलं आहे.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मागील तेरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान तसेच राज्यभर हे आंदोलन केले जात आहे. 13 दिवस उलटून गेले असले तरी राज्य सरकारकडून कोणताही ठोस तोडगा काढला जात नाहीये. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असेदेखील राणे यांनी म्हटले आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते. दरम्यान, नारायण राणे यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल परब मला कोकणचा नव्हे केरळचा वाटतो, असं वक्तव्य राणे यांनी केलं आहे. (Anil Parab seems to be Kerala, not from Konkan Kerala :  Narayan Rane)