Sadabhau Khot | परब साहेब आझाद मैदानावर या, तुम्हाला शिकवतो मागण्यांवर मार्ग कसा काढायचा- खोत
एसटी कामगारांचा संप सुटत नसल्याने एसटीच्या खासगीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
एसटी कामगारांचा संप सुटत नसल्याने एसटीच्या खासगीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवली तरी आंदोलन सुरूच राहील. एकही कामगार घरी जाणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. एसटीचे करणार अशी अफवा सरकार पसरवत आहे. त्यामुळे आमचा संप संपेल आणि सर्व एसटी कर्मचारी आपापल्या घरी जातील असं सरकारला वाटत आहे. पण हा सरकारचा भ्रम आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत असे काहीही होणार नाही. आम्ही आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असं खोत यांनी स्पष्ट केलं.
Latest Videos