Kirit Somaiya : अनिल परब यांना जेलमध्ये जावं लागणार, किरीट सोमय्यांचा इशारा
सोमय्यांनी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे राजकीय वातावरणात एकच विषय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) निशाण्यावर सध्या महाविकास आघाडीचे परिवहन मंत्री अनिल परब आहेत. किरीट सोमय्यांनी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे राजकीय वातावरणात एकच विषय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर आज गंभीर आरोप करून काही सवाल उपस्थित केले आहेत. परबांचा सातबारा कोरा करणार, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. तर याचवेळी त्यांनी साई रिसॉर्टचा टॅक्स अनिल परबांनी भरला असल्याचंही त्यांनी उघड केलं. यावेळी किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही टीका केली आहे. दरम्यान, अनिल परब यांना जेलमध्ये जावं लागणार, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.
Published on: May 27, 2022 11:23 AM
Latest Videos