Loksabha Election Exit Poll 2024 : देशात कुणाचं सरकार? महाराष्ट्रात कुणाचा जोर? महायुती की मविआ? अनिल थत्ते यांनी निकालच सांगितला

Loksabha Election Exit Poll 2024 : देशात कुणाचं सरकार? महाराष्ट्रात कुणाचा जोर? महायुती की मविआ? अनिल थत्ते यांनी निकालच सांगितला

| Updated on: Jun 01, 2024 | 5:00 PM

देशात एकूण सात टप्प्यात मतदान झालं. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे टिव्ही ९ मराठीवर जाहीर होणार आहेत. त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी लोकसभेचा एक्झिट पोल जाहीर होण्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबद्दल भाकीतं केली आहेत.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आज शेवटचा टप्पा पार पडत आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान झालं. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे टिव्ही ९ मराठीवर जाहीर होणार आहेत. त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी लोकसभेचा एक्झिट पोल जाहीर होण्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबद्दल भाकीतं केली आहेत. ते म्हणाले, ३७ ते ४० जागा या महायुतीच्या पारड्यात पडतील तर उतरलेल्या इतर जागा महाविकास आघाडीला मिळतील. तर राज्यातील अशा १३ जागा आहेत जिथे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लोकसभेची लढत झाली. ज्या ठिकाणी शिंदे गटाची शिवसेना विरूद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या लोकसभेचा सामना रंगला तिथे शिंदे गटाला जास्त जागा मिळणार आहे. १-२ जागा सोडल्या तर ४० आमदाराचा जोर असल्याने सर्वाधिक जागा शिंदे गटाच्या जिंकतील, असा दावाच राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी केला. दरम्यान भाजपकडून ४०० पार चा नारा सातत्याने देण्यात येत होता. यावर अनिल थत्ते यांनी स्पष्टपणे सांगितलं, सव्वा ३०० ते साडे ३०० जागा या महायुतीला मिळतील असा अंदाज आहे.

Published on: Jun 01, 2024 05:00 PM