नागपुरच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट, नागरिकांना मनस्ताप अन् नगरपालिकेसह प्रशासनाचे दुर्लक्ष
VIDEO | नागपुरात मोकाट जनावरांनी अख्खा रस्ता घेतला ताब्यात, मोकाट जनावरांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
नागपूर, 30 जुलै 2023 | पावसाच्या दिवसात नागपुरकरांना एका वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागत आहे. ते म्हणजे रस्त्यावर बसणारी मोकाट जनावरं. ही जनावरं रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना अपघाताच निमंत्रण देत आहे. मोकाट जनावरं रस्त्यावर बसत असल्यानं ती जनावर अनेक ठिकाणी अख्खा रस्त्या आपल्या ताब्यात घेत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय. जनावरांची झुंडच्या झुंड रस्त्यावर बसल्यानं वाहनं चालकांना त्यातून मार्ग काढणं कठीण होऊन जाते. ही जनावरं मालकांची असली तरी संध्याकाळच्या वेळी या जनावरांना त्यांचे मालक घरी घेऊन जातात आणि दूध काढल्यानंतर सकाळी मात्र त्यांना मोकाट सोडून देतात. मग या जनावरांचा दिवसभर रस्त्यावर आतंक पाहायला मिळतो. त्यामुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना सुद्धा नागपुरात पुढे आल्या आहेत. मात्र याकडे ना महापालिकेचे लक्ष, ना वाहतूक पोलिसांचं. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर बसलेल्या या जनावरापासून स्वतःच रक्षण करावं लागत आहे.