Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी? काय केला मोठा गौप्यस्फोट?

पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी? काय केला मोठा गौप्यस्फोट?

| Updated on: Apr 02, 2025 | 11:30 AM

पाच वर्षापूर्वी पंकजा मुंडेंच्या काही फाईल घेऊन स्वतः धनंजय मुंडेच आपल्याकडे आले होते असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या दाव्यानुसार त्यावेळी धनंजय मुंडे सोबत घनवट नावाचे एक गृहस्थ होते आणि त्या घनवट यांच्यावरून आता जमीन हडपल्याचा आरोप होतो आहे.

धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असणाऱ्या राजेंद्र आणि पोपट घनवट यांच्यावर अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. पहिला म्हणजे जेव्हा धनंजय मुंडे विरोधी पक्षात होते, त्यावेळी पंकजा मुंडेंच्या कथित घोटाळ्याच्या विरोधात याच घनवट यांनी कागदपत्र देण्यासाठी कॉल केला होता असे दमाणी यांनी म्हटलं. कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात घेतल्याच्या आरोपात पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी कुटुंबियांनी दमानिया यांची भेट घेतली. आरोपानुसार घनवट हे धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कंपनीमध्ये पार्टनर आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर दबाव टाकून त्यांनी कवडीमोल भावात जमीनी खरेदी केल्याचा आरोप आहे. या विरोधामध्ये तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याचाही दावा आहे. मात्र घनवट यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. माहितीनुसार घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहे. शुगर मिलमध्ये सर्वजण संचालक असून ते पेशाना बांधकाम व्यवसायिक आहेत. दरम्यान, अंजल दमानिया यांनी आरोपांबद्दल सरकार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे यावर काय निर्णय होतो ते पाहण महत्त्वाचं असेल.

Published on: Apr 02, 2025 11:30 AM