Beed Deshmukh Case : वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?

Beed Deshmukh Case : वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?

| Updated on: Jan 08, 2025 | 10:38 AM

आता करोडोंचा मालक असल्याचे समोर येऊ लागलंय. पक्षाच्या कोणत्याही पदावर नसताना कराडने जमवलेल्या मायेचा तपशील थक्क करणारा आहे. कराडकडे इतकी संपत्ती आली कुठून असे आरोप होत असताना आता या प्रकरणात ईडी एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे कधीकाळी घरकाम करणारा वाल्मिक कराड… आता करोडोंचा मालक असल्याचे समोर येऊ लागलंय. पक्षाच्या कोणत्याही पदावर नसताना कराडने जमवलेल्या मायेचा तपशील थक्क करणारा आहे. वाल्मिक कराडकडे इतकी संपत्ती आली कुठून असे आरोप होत असताना आता या प्रकरणात ईडी एन्ट्री होण्याची शक्यता आहे. सुरेश धस यांच्या दाव्यानुसार, वाल्मिक कराडची बीडमध्ये ५० एकर जमीन आहे. बार्शीत ४५ एकर, सोनपेठमध्ये ५० एकर, पारगावमध्ये ४० ते ५० एकर, पुण्यात मगरपट्टा योथे एक फ्लोअर याशिवाय धनंजय मुंडे यांच्यासोबत अनेक व्यवसायात पार्टनरशिप आहे. अंजली दमानियांचा आरोपांनुसार, केज, वडवनी, बीड आणि परळी याठिकाणी चार ते पाच वाईन शॉप आहे. या प्रत्येक दुकानांची किंमत पाच कोटी रूपये आहे. या माहितीसाठी अंजली दमानिया यांनी उत्पादन शुल्क विभागाकडून माहिती मागवली होती. यावेळी वाईन शॉपच्या दुकानांची यादी प्राप्त झाली आहे. मात्र मालकांची नावे नव्हती. याच्या दुसऱ्यादिवशी दमानियांना एक निनावी पत्र आलं त्यात मालकांच्या नावांचा उल्लेख होता. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 08, 2025 10:38 AM