Anjali Damania : ‘… तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार’, करूणा शर्मांच्या वक्तव्यानंतर दमानियांचं मोठं वक्तव्य
न्यायालयात करुणा शर्मा यांना पोटगी मिळण्याप्रकरणी अंतिम युक्तीवाद करण्यात आला. आज झालेल्या युक्तिवादादरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. यावर करूणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावर दमानियांनी भाष्य केले आहे.
करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रूपयांची पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना वांद्रे सत्र न्यायालयाने दिले होते. दरम्यान न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात करूणा शर्मांकडून धनंजय मुंडेंविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी धनंजय मुडेंच्या वकिलांकडून असा दावा करण्यात आला की, ‘धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेंसोबत झालेले लग्न अधिकृत नाही. धनंजय मुंडेंनी मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही’, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. तर येत्या पाच तारखेला यासंदर्भातील सर्व पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचे करूणा शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, या युक्तिवाद आणि प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचा हा वैयक्तिक वाद आहे. पण जर खरंच दोघांचं लग्न झालं असेल आणि त्याचे पुरावे करूणा शर्मा यांच्याकडे असेल तर धनंजय मुंडे यांची आमदारकी नक्की रद्द होईल. यात काही शंका नाही. ‘, अशी स्पष्ट प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.

धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..

'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?

वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
