Anjali Damania : कराडवर मकोका अन् पुन्हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, अंजली दमानिया स्पष्टच म्हणाले…
वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराडला मकोका कोर्टासमोर सादर करण्यात येतंय यावरून आता तपासाची गाडी कुठेतरी रुळावर येईल. तपासाची दिशा योग्य दिशेला जाईल. खंडणी आणि संतोष देशमुख यांचा खून हे काही वेगळे नाही. ही दोन्ही प्रकरण वेगळी नाहीत मकोका लागल्याने या सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे अंजली दमानिया म्हणाल्या. पुढे त्या असंही म्हणाल्यात, 30 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर वाल्मिक कराड शरण आला हा काही योगायोग नाही. मे महिन्यापासून मी काही गोष्टी सांगत होते परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याचवेळी मकोका लावण्यात आला असता तर आता संतोष देशमुख जिवंत असते. अजून देखील माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.