Anjali Damania : कराडला तुरूंगात मारहाण? अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘या टोळ्यांमध्ये दुश्मनी…’
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघेही मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असून हे दोघोही सध्या बीडच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे. अशातच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर दमानियांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘माझ्यापर्यंत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला तुरूंगात बेमद मारहाण झाल्याची माहिती पोहोचली नाही.’, असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडला तुरुंगात मारहाण झालेल्या माहितीवर भाष्य केले आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या की, तुरूंगात मकोका अंतर्गत वाल्मिक कराडसह इतरही काही आरोपी शिक्षा भोगत आहेत. त्या वेग-वेगळ्या टोळ्या आहेत. या टोळ्यांमध्ये आपापसात काहीतरी भांडणं झाली असावी. कारण या टोळ्यांमध्ये टोकाची दुश्मनी होती. त्यामुळे जर मारहाण झाली जरी असेल तरी यात काही नवल नसल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. तर तुरूंग प्रशासनाचं अशा घटनांमध्ये अपयश वाटतं का? असा सवाल केला असता दमानियांनी यावर देखील थेट भाष्य केले आहे. ‘या आरोपींची बराक वेगवेगळी होती. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे जेलच्या एका बराकमध्ये असताना ही मारहाण कशी झाली, कुठे झाली? याची माहिती नाही. पण यासंदर्भातील माहिती नक्की बोलेने’, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
