Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania : 'दम नाही... त्यांनी आता हिंदी सिनेमे पाहणं...', दमानियांचा सुरेश धसांना खोचक सल्ला

Anjali Damania : ‘दम नाही… त्यांनी आता हिंदी सिनेमे पाहणं…’, दमानियांचा सुरेश धसांना खोचक सल्ला

| Updated on: Apr 01, 2025 | 12:52 PM

सुरेश धस यांनी एका मुलाखतीमध्ये हा गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सुरेश धस यांनी केलेल्या या खळबळजनक आरोपांवर अंजली दमानियांचा हल्लाबोल

सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला वायफळ प्रयत्न असल्याचे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लबोल केलाय. दरम्यान, खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यावर अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘सुरेश धस यांनी कोणता विषय कुठे जोडला? मला वाटतं ते हिंदी चित्रपट जास्त बघतात. गेले दोन महिने सुरेश धस हे संतोष देशमुख यांच्या प्रकरणासाठी लढले. त्यामुळे त्यांची चांगली इमेज तयार झाली होती. पण धनंजय मुंडेंना गुपचूप भेटल्याची माहिती समोर आली. यासह सतीश भोसले प्रकरण बाहेर आलं आणि त्यांच्या इमेजला तडा गेला.’, असं अंजली दमानियांनी म्हटलं. इतकंच नाहीतर सुरेश धसांचा हा स्टंट असून त्यांनी हिंदी चित्रपट पाहणं कमी करावं, असं म्हणत दमानियांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. यासह धसांनी केलेल्या गंभीर आरोपात कोणताही दम नसल्याचे म्हणत अंजली दमानिया यांनी यावर सविस्तर बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Apr 01, 2025 12:52 PM